Vartadoot
Wednesday, April 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/03/2026
in लोहारा तालुका
A A
0
नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
Ad 10

निवडणुकीत मतदारांच्या अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन प्रत्येक उमेदवारांकडून दिले जाते. परंतु निवडून आल्यावर ते आश्वासन पूर्ण केले जाईलच याची काहीच गॅरंटी नसते. परंतु सास्तुर गणात सध्या आशादायी चित्र दिसून येत आहे. नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी मतदारसंघातील अडीअडचणी सोडविण्याचा चंगच बांधला असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील सास्तुर गणाच्या पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी निवडणुकीपूर्वी तीन चार महिन्यापासूनच या मतदारसंघात संपर्क वाढवला होता. नागरिक, महिलांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला होता. आता तर त्या या गणाच्या सदस्या आहेत. निवडून आल्यावर तात्काळ त्यांनी त्यांच्या गणातील विविध गावात जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. यावेळी नागरिकांकडून अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, निराधार महिलांच्या पगारी वेळेवर करणे, गावात सार्वजनिक ठिकाणी हायमस्ट लॅम्प उभारणे, पाणीपुरवठा, स्मशानभूमीत असलेल्या समस्या, घरकुल, तरुणांना रोजगाराच्या संधी आदी अनेक प्रश्न त्यांच्यासमोर नागरिकांनी उपस्थित केले. प्रगती घोटाळे यांनीही त्या सर्व समस्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी तात्काळ पाठपुरावा सुरू करू असे आश्वासन दिले. तसेच याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनद्वारे संपर्क साधून समस्या सोडविण्यासाठी सांगितल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशितोष देशमुख, दीपाली देशमुख, उमेश देशमुख, सुरेखा पोतदार, सास्तुरचे उपसरपंच सलमान सवार यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला सदस्या असूनही प्रगती घोटाळे यांनी मतदारसंघात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

Next Post

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
लोहारा तालुका

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

25/04/2026
सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

14/04/2026
लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

12/04/2026
वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
लोहारा तालुका

वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

12/04/2026
भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती
लोहारा तालुका

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती

10/04/2026
खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट
लोहारा तालुका

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

06/04/2026
Next Post
हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's