वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात मागील आठवड्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना विविध गैरसोयीचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर दक्षता घेणेसंदर्भात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.११) लोहारा नगरपंचायत येथे आढावा बैठक संपन्न झाली.
शहरातील स्वच्छतेसह तुंबलेल्या गटारी वेळच्या वेळी साफ करणे, आवश्यक त्या ठिकाणी नळकांडी पाईप टाकणे, नाले सफाई करणे, याला प्राधान्य देऊन सदर कामे तात्काळ करणेबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी सूचना केल्या. या बैठकीची माहिती मिळाल्याने त्या त्या प्रभागातील समस्या सांगण्यासाठी आलेल्या सर्व माजी नगरसेवक, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत नगरपंचायतचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले व मुख्याधिकारी गजानन शिंदे यांना निर्देश दिले. या बैठकीत लोहारा शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठयाची सद्यस्थिती, विविध योजनेतून मंजूर असलेल्या कामांची सद्यस्थिती, घरकुल योजना आढावा, वीज वितरण व्यवस्था व कोविडची सद्यस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अबुलवफा कादरी, अभिमान खराडे, प्रताप घोडके, श्याम नारायणकर यांच्यासह श्रीकांत भरारे, कलिम खुटेपड, अमीन सुंबेकर, भरत सुतार, शिवा सुतार व नागरिक उपस्थित होते.
No Result
View All Result
error: Content is protected !!