या अभियानाच्या माध्यमातून लोहारा तालुक्यामध्ये जेवळी प्रभाग संघ अंतर्गत तालुकास्तरीय प्रियदर्शनी पोषण बाग शशिकला अशोक चौगुले यांच्या शेतामध्ये तीन गुंठे जमिनीवर १४ वाफ्याची प्रदर्शनीय पोषण परसबाग तयार करण्यात आली असून या पोषण बागेमध्ये १४ प्रकारच्या पालेभाज्या, गांडूळ खत युनिट, औषधी वनस्पती, फुल शेती, फळशेती, इत्यादी डेमो एकत्रित पोषण बागेमध्ये केलेले आहे. तसेच जेवळी प्रभागांमध्ये उत्तर जेवळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळी येथे नवप्रभा महिला प्रभाग संघ जेवळी अंतर्गत पोषण परसबाग तयार करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर वैयक्तिक तसेच सामूहिक पोषण बाग बनवण्यात येत आहे. सोबतच महिला बालकल्याण विभाग व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून ही पोषण बाग याची आखणी करण्यात येत आहे अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका अभियान व्यस्थापक प्रणिता कटकदौंड यांनी दिली.