वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी मुख्तार चाऊस यांची तर जिल्हा महासचिव पदी शेख लईक अहमद यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हा महासचिव पदी शेख लईक अहमद यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अल्पसंख्यांक विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मुख्तार चाऊस यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी (दि.२३) राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद येथील कार्यालयात ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील पठाण, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, माजी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख, लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख, उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, शहर उपाध्यक्ष मन्नान काझी, इस्माईल काझी, तुळजापूर शहर उपाध्यक्ष मकसूद शेख, अमोल सुरवसे आदी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.