Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

कोरेगाववाडी येथे मोफत मधुमेह, रक्तदाब आणि नेत्र तपासणीचे शिबीर – स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या फिरत्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय संचालित फिरत्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून कोरेगाववाडी येथे मोफत मधुमेह, रक्तदाब आणि नेत्र तपासणीचे शिबीर आयोजित केले होते. गावातील ३०३ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. स्पर्शच्या दारापर्यंत पोहोचणाऱ्या वैद्यकीय सेवांमुळे लोकांचे अंगावर आजार काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी भावना गावकर्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या वतीने तुळजापूर आणि उमरगा तालुक्यांमध्ये २४ गावांमध्ये नव्याने फिरते ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आले आहेत. स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाने अतिदुर्गम ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगल्या वैद्यकीय सेवा आणि आरोग्य शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न फिरत्या वैद्यकीय पथकाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी येथे मोफत मधुमेह, रक्तदाब आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कोरेगाववाडी आणि ग्रामस्थांच्या प्रतिसादाने गावातील ३०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दरम्यान बोलत असताना प्रकल्प समन्वयक तुकाराम गायकवाड यांनी मधुमेह आणि रक्तदाब यांच्या तपासणीचे महत्व नागरीकांना समजावून सांगितले आणि नजीकच्या काळामध्ये इतर २४ गावांमध्ये सुद्धा अशीच एकदिवसीय शिबिरे आयोजित करण्यात येतील असे सांगितले. डॉ. वैशाली जाधव आणि डॉ. मुजावर सर आणि स्पर्शचे वैद्याकीत पथक यांनी नागरिकांची तपासणी केली. शिबिरामध्ये वैद्यकीय तपासणी, आवश्यकतेनुसार औषध-उपचार, चष्मा, समुपदेशन आणि वैद्यकीय सल्ला नागरिकांना देण्यात आला. \"\"या शिबिरास माजी सरपंच नागनाथ कुंभार, आशा कार्यकर्ती कोंडाबाई माने, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प समन्वयक तुकाराम गायकवाड, डॉ. वैशाली जाधव, डॉ. मुजावर सर, सुपरवाईजर सुरज चव्हाण, पवन गायकवाड, मारुती धनगुले, आदिनाथ डीग्गे, प्रवीण कांबळे, प्रतीक्षा गायकवाड, प्रतीक्षा गोरे, रवी नटवे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: स्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त केसरजवळगा ग्रामस्थांकडून सपत्नीक सत्कार

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी मुख्तार चाऊस यांची तर जिल्हा महासचिव पदी शेख लईक अहमद यांची निवड

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी मुख्तार चाऊस यांची तर जिल्हा महासचिव पदी शेख लईक अहमद यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!