वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त संत सेना महाराज नाभिक संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
तालुक्यातील अचलेर येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन सिद्धाना सुरवसे, ह.भ.प. दत्तू अतकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अचलेर येथील अशोक सुरवसे, सुधाकर सुरवसे, गुंडू सुरवसे, बसवराज सुरवसे, सिद्राम सुरवसे, रवींद्र सुरवसे, कृष्णात सुरवसे, संतोष सुरवसे, जगदीश सुरवसे, प्रकाश सुरवसे, दिपक सुरवसे, पंकज सुरवसे, पंडीत सुरवसे, राहुल माने, सतिश वाळके यांच्यासह संत सेना महाराज नाभिक महामंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश सुरवसे यांनी केले.