वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विद्यार्थ्याने त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे. तसेच एखादे ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्दीने प्रयत्न केल्यास त्यांना यश हमखास प्राप्त होईल असे प्रतिपादन आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी केले.लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयातून नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांचा सत्कार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात शनिवारी (दि.१८) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयातून विविध कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांचा सत्कार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, किशोर साळुंके, शंकर आण्णा जट्टे, प्रवीण पाटील, अभिजीत लोभे, बसवराज कारभारी, शहाजी पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य वीरभद्रेश्वर स्वामी, यशवंत चंदनशिवे, विनोद तुंगे, राजेंद्र पात्रे, अभिजित सपाटे, स्वाती निकम, स्नेहलता करदुरे, अरविंद हंगरगेकर, राजपाल वाघमारे, पृथ्वीराज जगताप, नवनाथ वकील, अमर कीर्तने, बालाजी जगताप महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.