वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना विविध धान्या पासून बनविलेल्या बिस्किटाचे वाटप करण्यात आले. शासनाच्या शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आता नव्यानेच बाजरी, ज्वारी, सोयाबीन, नाचणी, तांदूळ या धान्यापासून कृत्रिम पध्दतीने बनविण्यात आलेले बिस्कीटाचे पाकीट शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आले. आहारातून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्व मिळण्यास मदत होणार आहे. हे बिस्कीट पाकिटे वाटप करताच विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजल्याने आता शालेय विद्यार्थी शाळेत येण्यासाठी ओढ लागली आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लिंबराज पाटील, मुख्यध्यापक एम. जी. कुलकर्णी, भीमाशंकर डोकडे, गजानन मक्तेदार, संजय संदिकर, उद्धव विभूते, बाळासाहेब कदम, मच्छिद्र बोकडे, दत्तात्रय माने यांच्यासह पालक उपस्थित होते.