Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुचाकी ढकलून अनोखे आंदोलन – मोदींच्या जुन्या आश्वासनांच्या भाषणाची क्लिप वाजवून निषेधाच्या घोषणा

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
घरगुती गॅससह, पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडले असल्याने याविरोधात उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भात लावण्यात आलेले फलक व घोषणा देत गुरूवारी (दि. २१) हुतात्मा स्मारकापासुन तहसील कार्यालयापर्यंत दुचाकी ओढत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर इंधन दरवाढीचा निषेध करीत दुचाकी फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध केला. तसेच २०१४ सालीची जुनी नरेंद्र मोदी यांनी केलेली फसवी भाषणे वाजवुन उपरोधात्मक घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत असून वेळोवेळी इंधन दरवाढ करत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या फसव्या योजनांची माहिती जगजाहीर करून इंधन दरवाढ कमी न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते दुचाकी वाहनासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\"\"यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य पद्माकरराव हराळकर, तालुकाध्यक्ष संजय पवार, विधानसभा युवक अध्यक्ष बाबा पवार, युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, उपाध्यक्ष प्रताप तपसाळे, विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, ग्रंथालय सेलचे जगदीश सुरवसे, उमाकांत पाटील, भैय्या शेख, सरपंच रणजीत गायकवाड, बाबा सोनकांबळे, बाळू बुंदगे, राजकुमार माने, मिर्झा बेग, संजय जाधव, वाघंबर सरवदे, अजित पाटील, नेताजी कवठे, राजू तळीखेडे, फय्याज पठाण, अभय पाटील, ज्ञानदिप सूर्यवंशी, कमलाकर पाटील, बाळू फरताळे, राम सुरवसे, अभिषेक वडदरे, विठ्ठल अंबुलगे, मारुती होगाडे, बाबुराव कुकूर्डे, खंडू काळे, सुरेश वाकडे, माधव नांगरे, भरत देडे, दिलदार मोजीनदर, दिलीप जाधव, पवन पाटील, विष्णू गायकवाड, कृष्णा पांचाळ, राजू तुरोरीकर, राहुल पवार, संभाजी कांबळे, इरफान पटेल, हाजी सय्यद, इस्माईल जमादार, विजय पाटील, व्यंकट बिराजदार, सचिन सुरवसे, प्रभाकर माने, कुमार थिटे, अनिकेत तेलंग, राजाभाऊ तुरोरीकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आंदोलनराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

लोहारा तालुक्यातील होळी येथील युवा शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम – झेंडूच्या ऑनलाईन विक्रीतून मिळाला हजारो रुपयांचा नफा

Next Post

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जि प शाळेत विद्यार्थ्यांना धान्यापासून बनविलेल्या बिस्किटाचे वाटप

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जि प शाळेत विद्यार्थ्यांना धान्यापासून बनविलेल्या बिस्किटाचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!