वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मंजूर असलेल्या लोहारा तालुक्यातील विविध विकासकामांचे गुरुवारी (दि. ३०) सास्तूर, मार्डी व हिप्परगा (रवा) येथे भूमिपूजन करण्यात आले.
हा भूमिपूजन सोहळा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून लोहारा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अनेक विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यात सास्तूर ते सालेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५०० लक्ष, सास्तूर-कोंडजिगड ते बलसूर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ६१ लक्ष, आरणी ते कानेगाव – कास्ती – हिप्परगा रोडवरील लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी २१७ लक्ष, पाटोदा ते लोहारा रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ५५० लक्ष आदी कामांचा समावेश आहे. या कामांचा भूमिपुजन सोहळा गुरुवारी (दि.३०) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखली व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य दीपक जवळगे, माजी शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख जगन पाटील, शहरप्रमुख सलीम शेख, अविनाश माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस.एस.घोडके, राजेंद्र माळी, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, युवा सेना विधानसभा संघटक शरद पवार, अभिमान खराडे, अबुलवफा कादरी, आयुब शेख, प्रमोद बंगले, हिप्परगा (रवा) चे सरपंच राम मोरे, इंद्रजीत लोमटे, दीपक रोडगे, शिवाजी कदम, दत्ता पाटील, विलास भगत, सालेगावचे सरपंच नारायण गुरव, बालाजी पवार, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, प्रदीप गोरे, मुरली पवार, लायकसाब कादरी, महम्मद बागवान, बालेपीर शेख, नितीन जाधव, शिवाजीराव मोरे, सुरेश दंडगुले, सारंग घाटे, योगेश जाधव, नामदेव लोभे, बाळू कोरे, बालाजी जाधव, हमीद पठाण, भरत सुतार, दत्ता मोरे, आण्णासाहेब पाटील, किरण पाटील आदीसह नागरिक उपस्थित होते.