वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) वि.का. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तू निवृत्ती जाधव तर व्हाईस चेअरमन पदी कार्ला येथील सुनिल शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) वि.का. सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड गुरुवारी (दि. ३०) करण्यात आली. या सोसायटी मध्ये हिप्परगा(रवा), शिवकरवाडी व कार्ला या गावांचा समावेश आहे. सोसायटीच्या सदस्यपदाची निवडही बिनविरोध झाली होती. गुरुवारी (दि. ३०) सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी बैठक झाली. यावेळी चेअरमन पदी हिप्परगा (रवा) येथील दत्तू निवृत्ती जाधव तर व्हाईस चेअरमन पदी कार्ला येथील सुनिल शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सी. एन. विभुते यांच्यासह विजय लोमटे, इंद्रजित लोमटे, बाबा श्रीनामे, काका पवार, साहेबराव मुळे, संतोष गवळी, अनिल मोरे, नारायण माळी, प्रभाकर लोमटे, सेक्रेटरी दस्तगीर पटेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.