वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी ( दि. १६) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये ३ तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये ८ असे एकूण ११ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
लोहारा तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाचे तुरळक रुग्ण आढळून येत होते. परंतु चार पाच दिवसांपासून पासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी ( दि. १६) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात एकूण ११ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या ५१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
रविवारी प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये लोहारा शहरातील १ व माकणी येथील २ असे एकूण ३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये लोहारा २, कोंडजीगड १, जेवळी १, सास्तुर ३, माकणी १ असे एकूण ८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे लोहारा तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५१ झाली आहे. एकूणच दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे.