Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा नगरपंचायत निवडणुक – उमेदवारांच्या प्रचारार्थ राजकीय नेते मतदारांच्या भेटीला – चारही प्रभागात जोरदार चुरस

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक सुरू आहे. या चार जागांसाठी मंगळवारी (दि. १८) मतदान होणार आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली. त्यामुळे लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या चार प्रभागाची वगळता उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर उर्वरित चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या चारही ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग क्र. ८ मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सारिका प्रमोद बंगले व काँग्रेसच्या उमेदवार माजी नगराध्यक्षा ज्योती दिपक मुळे यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. प्रभाग क्र. १० मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अविनाश बळीराम माळी, काँग्रेसकडून विजयकुमार भानुदास ढगे तसेच अपक्ष म्हणून रियाज खडीवाले, कल्याण ढगे, अतिउल्लाखान पठाण यांच्यात लढत होत आहे. प्रभाग क्र. १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना आघाडीचे असिफ बागवान तर काँग्रेसकडून आरिफ खानापुरे यांच्यात थेट लढत होत आहे. प्रभाग क्र. १७ मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या आरती ओम कोरे, काँग्रेसकडून निर्मला शिवलिंगय्या स्वामी तसेच अपक्ष म्हणून देवश्री भरत सुतार, छबन संबय्या स्वामी यांच्यात लढत होत आहे.

\"\"

\"\"या चार जागेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार प्रचारयंत्रणा राबविण्यात येत आहे. मागील दोन दिवसांपासून प्रत्येक प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटीसाठी दोन्ही बाजूंच्या राजकीय पक्षाचे नेते शहरात दाखल होत आहेत. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, युवा नेते किरण गायकवाड, तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवी कोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. १६) मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला. तर काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, शहराध्यक्ष आयनोद्दीन सवार, पंचायत समिती उमरग्याचे सभापती सचिन पाटील, जि प सदस्य रफिक तांबोळी, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश राठोड यांनी प्रचार केला.\"\"\"\"प्रत्येक प्रभागातील उमेदवार मतदारांना मीच कसा योग्य आहे हे पटवून देत आहे. मी प्रभागातील सर्व समस्या दूर करेन, जनतेची सेवा करेन अशी विविध आश्वासने देत आहेत. परंतु सुज्ञ मतदार त्यांचे अमूल्य मतदान कोणाच्या बाजूने देतो हे निकालानंतरच लक्षात येईल. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १८) सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ad 2
Ad 1
Tags: काँग्रेस (आय)लोहारा नगरपंचायत निवडणूकशिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
Previous Post

लोहारा तालुक्यात रविवारी ११ रुग्णांची भर – तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या झाली ५१

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागेसाठी आज मतदान – चार प्रभागातील १७३१ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागेसाठी आज मतदान - चार प्रभागातील १७३१ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!