Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

महावितरण लोहारा सबस्टेशन मधील लिपिक अँटिकरप्शनच्या जाळ्यात, १५ हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी पथकाने रंगेहाथ पकडले

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कंत्राटी पद्धतीने वायरमन ट्रेड शिकाऊ कामगार म्हणून कंत्राटदाराला सांगुन कामावर घेतो असे म्हणुन पंधरा हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी लोहारा येथील महावितरण सबस्टेशन मधील लिपिकास गुरुवारी (दि. ३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना कंत्राटी पद्धतीने वायरमन ट्रेड शिकाऊ कामगार म्हणून कंत्राटदारांला सांगुन कामावर घेतो असे म्हणुन यातील तक्रारदार यांच्याकडे लोहारा येथील महावितरण सबस्टेशन मधील लिपिक अमर पटाडे याने पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करून पंधरा हजार रुपये लाचेची रक्कम गुरुवारी (दि.३) लोहारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वत: पंच व साक्षीदार समक्ष स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या पथकात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक हुलगे, इफ्तकार शेख, सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावासकर, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे आदींचा सहभाग होता. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Tags: उस्मानाबादमहावितरणलाचलुचपत प्रतिबंधक विभाग
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयसीड फाउंडेशनच्या वतीने विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा – स्पर्धेत १२० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

Next Post

मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात स्वंयशासन दिन उत्साहात साजरा

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात स्वंयशासन दिन उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!