वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्याचे युग आधुनिक आहे. तसेच शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. याचाच प्रभाव स्वयंशासन दिनी लोहारा तालुक्यातील जि.प.प्रा.शा.भोसगा शाळेत दिसून आला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला.तालुक्यातील भोसगा येथील जि प प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन घेण्यात आला. यावेळी विद्यार्थी शिक्षकांच्या भुमिकेत होते. विद्यार्थ्यांनी शिकवताना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आपला प्रभाव शाळेत पाडला व आपला पाठ उत्तम रित्या सादर केला. यावेळी परिपाठात राष्ट्रगीत, सुविचार, प्रार्थना, बोधकथा, मौन, संगितमय कदमताल असे विविध उपक्रमाचे शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यानंतर सर्व शिक्षक वर्गात जाऊन प्रत्यक्ष हजेरी घेतले व तासानुसार पाठ शिकविण्यास सुरुवात केले. काही शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी शिकवताना शैक्षणिक साधनांचा वापर केला, तर काहिंनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. या स्वयंशासन दिनानिमित्त मुख्याध्यापक म्हणून कार्तिक थोरात, पर्यवेक्षक म्हणून झोया शेख व सातवी मधील सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या भुमिकेत होते.शेवटच्या तासाला सर्वांचे मनोगत घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक एम. एम. डोखले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष काशिनाथ मनाळे, उपाध्यक्ष दत्ता बिराजदार, वर्गशिक्षक एस. के. चिनगुंडे, शिक्षक एस. आर. डावरे, एस. एस. भोसले, व्ही. बी. धालगडे, डी. बी. कांबळे आदी उपस्थित होते.