वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील माळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ग्रामस्वच्छता व जलसंवर्धनासाठी युवक शिबिराचे सोमवारी (दि.२१) उद्घाटन करण्यात आले.
तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माळेगावच्या सरपंच बबीता सुरवसे, उपसरपंच अण्णाराव एकंबे, पोलीस पाटील बालाजी कदम, शहाजी गर्जे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवराम गोरे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संजय गर्जे, प्राचार्य डॉ. विनायक पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. विनोद आचार्य, प्रा. डॉ. एस. व्ही. सोनवणे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक बालाजी मक्तेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शंकरराव जावळे पाटील व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी बालाजी मक्तेदार यांनी रासेयोच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वयंसेवकांची कर्तव्य आणि राष्ट्रीय सेवा योजना याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. विनायक पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद आचार्य यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एम. एल. सोमवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. एस. कदम, प्रा .डॉ. आर. एम. सूर्यवंशी, प्रा. डॉ. पी. के. गायकवाड, प्रा. डॉ. बी. एस. राजोळे, प्रा. डॉ. एस. एल. कोरेकर, प्रा. बी. बी. मोटे, प्रा. डी. एन. कोटरंगे, प्र. आर. एस. धप्पाधुळे, प्रा. एन. व्ही. अष्टेकर, डॉ. शिरिष देशमुख, प्रविण पाटील, प्रकाश राठोड, संजय फुगटे, परमेश्वर कदम आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.