Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागरण रॅली संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे गुरुवारी (दि. २४) जाणीव जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला स्पर्श ग्रामीण रुग्णालय याठिकाणी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून आलेले क्षयरोग नियंत्रण सुपरवायझर नागेश ढगे, स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा कदम, डॉ. वैभव माडजे, कार्यक्रम अधिकारी अच्युत आधटराव, तुकाराम गायकवाड यांच्यासह सर्व कर्मचारी, रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक व सास्तूर गावातील ग्रामस्थांनी क्षयरोग विषयक शपथ घेतली. त्यानंतर स्पर्श ग्रामीण रूग्णालयामधून संपुर्ण गावामध्ये जनजागरण रॅली काढण्यात आली.\"\"जागतिक क्षयरोग दिनानिमित्त “ टी बी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा” या घोषवाक्याप्रमाणे क्षयरोग संपविण्यासाठी व संपूर्ण भारत टीबी मुक्त करण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. आज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्षयरोगाचे रुग्ण सापडत आहेत. क्षयरोगमुळे बरेच लोक मृत्यूच्या दारात जात आहेत. त्यामुळे क्षयरोग संपविण्यासाठी प्रत्येकाने आपली योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतचा व कुटुंबाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावे. रॅली सुरु होण्यापूर्वी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी सर्व कर्मचारी, रुग्ण नातेवाईक व ग्रामस्थांना क्षयरोगाविषयी माहिती दिली. यामध्ये क्षयरोग म्हणजे काय, क्षयरोगाची कारणे, क्षयरोगाची लक्षणे व क्षयरोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी इत्यादी विषयी सर्वाना माहिती दिली. तसेच क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. फक्त प्रत्येक व्यक्तीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर क्षयरोगविषयक सर्वांनी शपथ घेतली. त्यामध्ये क्षयरोगाविषयी घेण्यात येणारी काळजी, प्रतिबंधक उपाय, औषधी उपचार इत्यादी विषयी माहिती दिली. शपथ झाल्यानंतर स्पर्श ग्रामीण रुग्णालयातून रॅली काढण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, क्षयरोग विभाग जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील नागेश ढगे, तालुका क्षयरोग अधिकारी ज्ञानेश्वर बिराजदार, ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा कदम, कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव, तुकाराम गायकवाड यांच्या हस्ते जनजागरण रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. ही रॅली संपूर्ण सास्तूर गावामधून काढण्यात आली.

Ad 2
Ad 1
Tags: जागतिक क्षयरोग दिनस्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

लोहारा तालुक्यातील माळेगाव येथे शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास सुरुवात

Next Post

लोहारा तालुक्यातील कास्ती (खुर्द) येथे गणवेश वाटप व सत्कार सोहळा संपन्न

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील कास्ती (खुर्द) येथे गणवेश वाटप व सत्कार सोहळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!