वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील तावशिगड येथे सोमवारी (दि. १६) महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुप्रसिद्ध शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.लोहारा तालुक्यातील तावशिगड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१६) सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, गौतम बुद्ध, राजमाता अहिल्यादेवी होळकर या महामानवांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमीत्त सुप्रसिद्ध शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच मराठा भूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. यात औरंगाबाद येथील कृषिभूषण विजय अण्णा बोऱ्हाडे, तालुक्यातील सास्तुर येथील प्रगतशील शेतकरी गोविंदराव पवार, दाळिंब येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व टीव्ही ९ चे उस्मानाबाद प्रतिनिधी संतोष जाधव यांना मराठाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तावशिगडच्या सरपंच मधुमती पाटील राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, माजी जि प अध्यक्ष जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापसिंह पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके व पदाधिकारी यांनी केले आहे.