वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे. या महाविद्यालयायाचा एकूण निकाल ९६.५६ टक्के निकाल लागला आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे. या महाविद्यालयायाचा एकूण निकाल ९६.५६ टक्के निकाल लागला आहे. या महाविद्यालयातील एकूण २६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील एकूण २५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्रावीण्यासह ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणी मध्ये १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयायील वाणिज्य शाखेतून वैभवी मुकुंद रसाळ हिने ९१.३३ टक्के गुण मिळवत प्रथम, सायली दादासाहेब गंगणे हिने ९०.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय तर स्वप्नील सतीश होळकर याने ८७.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९७.८२ टक्के लागला आहे. महाविद्यालयायील विज्ञान शाखेतून मयुर सुनील बिराजदार याने ८९ टक्के गुण मिळवत प्रथम, रेणुका संतोष सूर्यवंशी हिने ८८.५० टक्के गुण मिळवत द्वितीय तर रिया रफिक शेख हिने ८८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९९.१० टक्के लागला आहे. महाविद्यालयायील कला शाखेतून शुभांगी आप्पासाहेब कांबळे हिने ८२.५० टक्के गुण मिळवत प्रथम, राणी राजेंद्र कदम हिने ७७.५० टक्के गुण मिळवत द्वितीय तर भगवान गोपाळ सातपुते याने ७५.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कला शाखेचा एकूण निकाल ९३.२६ टक्के लागला आहे. प्राचार्या यु. व्ही. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. शेषेराव जावळे पाटील व सर्व शिक्षकांनी महाविद्यालयायातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.