वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे गुरुवारी (दि.१८) सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांचा आढावा घेतला. यावेळी खासदार ओमराजे यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी खरीप पिकांचे झालेले नुकसान याविषयी कृषी सहाय्यक दीपक जाधव यांनी गावचे भौगोलिक क्षेत्र, लागवडी लायक क्षेत्र व झालेले पिकाचे पंचनामे याविषयी माहिती दिली. यावेळी गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक दीपक जाधव यांनी सास्तुर येथील जवळपास सर्व शेतकऱ्यांचे ९० टक्के नुकसान झाले आहे. याविषयी माहिती दिली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी तराळकर साहेब, कृषी पर्यवेक्षक भोसले उपस्थित होते.
यावेळी शेतकरी राम भालके, विष्णू देशमुख, तम्मा माळी, विनायक बारकुले, गोविंद सुतार, विकास पांचाळ, मल्लू माळी, बंकट माळी, मुरली पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी तलाठी श्री. कोकाटे, मंडळ अधिकारी श्री साळुंखे, ग्रामसेवक शिवानंद बिराजदार, विस्तार अधिकारी निंबाळकर उपस्थित होते.