वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या तालुकास्तरीय कार्यालयाचे उद्घाटन पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी के.डी. निंबाळकर व कृषी सहाय्यक शैलेश जट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक बी. बी. इनकर, ए. एन. मुळे, तालुका समन्वयक ए. वि. शेख, एस. एस. मोहिते, एस.डि. मनसुखे आदी उपस्थित होते. लोहारा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजना तसेच विविध योजनेसंदर्भातील अनेक बाबी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने कराव्या लागत आहेत. परंतु यामध्ये अनेक शेतकरी अशिक्षित असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने पिकांचे नुकसान भरण्यासाठी शेतकरी वंचित राहू नये, शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कसे करावे याची माहिती देण्यासाठी लोहारा शहरामध्ये तालुकास्तरीय ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या वतीने शहरातील ईदगा मोहल्ला एसबीआय बँकेच्या पाठीमागे तालुकास्तरीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.