वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर या संस्थेच्या वतीने तुळजापूर व लोहारा तालुक्यातील ३० गावातून निर्धार समानतेचा या प्रकल्पाच्या व्यासपीठावरून कार्यक्षेत्रातील गावांमध्ये स्त्री पुरुष समानता निर्माण व्हावी व महिलांवरील कौटुंबिक व सामाजिक हिंसाचार रोखला जावा यासाठी युवक आणि युवतींनी पुढाकार घ्यावा याकरिता निर्धार समानतेचा प्रकल्प व्यासपीठावरून गेल्या ३ वर्षापासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे.
या प्रक्रिये अंतर्गत कार्यक्षेत्रातील ३० गावांमध्ये ३० पुरुष प्रेरक व ३० महिला प्रेरीकेच्या माध्यमातून विवाहित पुरुष, महिला व युवक, युवती यांची गटबांधणी करून या गटांना स्त्री-पुरुष समानता, घरकामात पुरुषांचा सहभाग, समजदार जोडीदार, मुलींचे शिक्षण, महिलांवरील कौटुंबिक व सामाजिक हिंसाचार रोखणे. बालविवाहाचे दुष्पपरिणाम समाजातील विविध पातळीवर असलेले भेदभाव व त्याचे परिणाम आदी विषयांना घरून गट बैठका, प्रशिक्षण, मेळावे, चर्चासत्र, शिबिरे, सहली, पोस्टर प्रदर्शन तज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने, फिरते वाचनालय, आदी गोष्टींची माध्यम वापरून सदरील विषयासंदर्भातील जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न प्रकल्पाच्या व्यासपीठावरून चालू आहे.
या प्रक्रियेचा भाग म्हणून दि. ११ नोव्हेंबर २०२२ ते १५ नोव्हेंबर २०२२ या काळात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, हुंडा, व महिलांवरील नियंत्रणे आदी विषयांसंबंधी कार्यक्षेत्रात जाणीव जागृती व्हावी म्हणून ‘हिंसामुक्त जीवन, आनंदी जीवन’ अभियानाचे आयोजन हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर या संस्थेने केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील ३० गावांमधून प्रभात फेरी, पोस्टर प्रदर्शन मेळावे, चर्चासत्र, कलापथक, गटबैठका, तज्ञांचे मार्गदर्शन, आदी माध्यमे वापरून जागवा करण्यात येणार आहे.
या अभियानातर्गत लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात रविवारी (दि.१३) १२ वाजता वरील सर्व उपक्रम राबविले जाणार आहे. या प्रक्रियेत सहभाग घेऊन ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन हॅलो मेडिकल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.