उमरगा प्रतिनिधी :
उमरगा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ग्रामपंचायत, नगरपालीका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकी संदर्भात महत्वाची बैठक उमरगा तालुक्यातील बलसुर येथे रविवारी (दि २७ ) जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेश युवक सचिव दिग्विजय शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी, जिल्हा सचिव दत्ता इंगळे , ता. उपाध्यक्ष प्रताप तपसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विकासात्मक कामाच्या माध्यमातूनच भक्कम राष्ट्राची निर्मीती होते. जनता अराजकतेला आणि जुमलेबाजीला कंटाळली आहे. तुम्ही कामाला लागा, जनता तुमच्या पाठीशी आहे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार यांनी यावेळी बोलताना केले. या बैठकीसाठी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकी संदर्भात सर्व गट व गणातील गट, गणप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजय पवार, युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार, उद्योग सेलचे जगदीश सुरवसे , तालुका सचिव धीरज बेळंबकर , राजू माने, विष्णू भगत, मिर्झा बेग , अभिजीत माडीवाले, विठ्ठलसिंह राजपूत , खाजा मुजावर, कुमार थीटे, बालाजी साळुंखे , नेताजी कवठे, संजय जाधव , उमाकांत पाटील, ओम गायकवाड, प्रताप महाराज , मोहन शिंदे, विजय सगर , रणजीत गायकवाड, बाळासाहेब बुंदगे, देविदास पावशेरे, माधव नांगरे, किशोर जाधव, बालाजी पाटील , वाघंबर सरवदे, किसन कांबळे , नंदू जगदाळे , दयानंद बिराजदार, भाग्यश्री रणदिवे , रूपाली सोनकवडे, अभय पाटील, कमलाकर पाटील , दिलीप पवार , बाळु फरताळे, योगेश जाधव , ऋषी जाधव, विष्णू माने, अण्णाराव लामजणे, कलेश्वर जाधव ,आयुब पटेल, दादा पाटील , कृष्णा मदनसुरे, रणजीत भोसले, बालाजी बिराजदार, सुभाष गायकवाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .