Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

जेवळीत घडले हिंदू-मुस्लिम सलोख्याचे दर्शन – हिंदू मठाधीशांच्या हस्ते मुस्लिम मज्जीदीच्या बांधकामाचा शुभारंभ

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे जवळपास सत्तर लक्ष रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात येणाऱ्या मज्जिद बांधकामांचा शुभारंभ येथील मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते पार पडले. मुस्लिम धर्मीयांच्या मज्जिदीच्या बांधकामाचे शुभारंभ हिंदू मठाधीशांच्या हस्ते करून हिंदू- मुस्लिम सलोख्यासाठीचे आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
तालुक्यातील जेवळी गावचे भूकंपानंतर शासनाकडून संपूर्ण पुनर्वसन झाले आहे. यामुळे नव्या गावात मज्जिद नसल्याने येथील मुस्लिम बांधवांची हेळसांड होत होती. तात्पुरता उपाय म्हणून येथील प्रभाग एक मध्ये बसवराज पाटील हे राज्यमंत्री असताना आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहात सर्व धार्मिक विधी उरकण्यात येत होते. इमारत अपुरी पडत असल्याने आता या सभागृहाच्या शेजारीच जवळपास सत्तर लक्ष रुपये खर्चून सुसज्ज अशी नव्याने मज्जिद बांधण्यात येत आहे. यासाठी येथे वक्व बोर्ड औरंगाबाद अंतर्गत जामा मस्जिद कमिटी ट्रस्ट स्थापना करण्यात आली आहे. मज्जिद बांधकामासाठी मुस्लिम बांधवांकडून लोक वर्गणी गोळा करण्यात आली आहे.

\"जेवळी\"

बुधवारी (दि.१९) या मज्जिद बांधकामाचा शुभारंभ येथील गुरु सिद्धेश्वर मठाचे मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मौलवी नासिर आलम रजवी (जेवळी), मौलवी जाकेर शेख (येणेगुर), येथील जामा मस्जिद कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष दस्तगीर बेग, उपाध्यक्ष मुबारक मुजावर, सचिव युनूस पठाण, सहसचिव इस्माईल शेख, कोषाअध्यक्ष मैनोद्दीन मुल्ला, नसरुद्दीन मुल्ला, नवाज मुल्ला, हैदर मुल्ला, ताजुद्दीन मुल्ला, सुलतान मुल्ला, सुलतान अत्तार, रोहित कारभारी, बंदेनवाज शेख आदीसह हिंदू मुस्लिम नागरिक उपस्थित होते. एकीकडे देशात हिंदू- मुस्लिम द्वेष वाढीस लागल्याचे चित्र पाहावयास मिळत असताना जेवळी येथे मुस्लिम धर्मीयांच्या मज्जिदीच्या बांधकामाचा शुभारंभ एका हिंदू मठाधीशांच्या हस्ते करून येथील नागरिकांनी हिंदू- मुस्लिम सलोख्याचे आदर्श समाजापुढे ठेवले आहे.

Tags: जेवळी
Previous Post

लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Next Post

सास्तुर येथे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

सास्तुर येथे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!