सोलापूर (Solapur) येथील माजी महापौर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सोलापूर मध्ये एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले दिग्गज नेते महेश कोठे (Mahesh Kothe) यांचे मंगळवारी (दि.१४) निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक घटना आहे.
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते असे समजते. ते नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले. त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा झटका आला व यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे अचानकपणे निधन झाल्याने सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सोलापूर महापालिकेमध्ये महेश कोठे यांच्या नावाचा दबदबा होता. महेश कोठे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर होते. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
