वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे मार्शल आर्ट गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे नॅशनल लाठीकाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नॅशनल इनडोअर गेम सिरीज स्पर्धेमध्ये विविध राज्याने सहभाग नोंदवला होता. यामध्ये तमिळनाडू, वेस्ट बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र या राज्यामधून विद्यामाता इंग्लिश स्कूल धानुरी शाळेने अव्वल क्रमांक पटकावला. संपूर्ण भारतामध्ये धानुरी गावाचे नाव लौकिक केले. या स्पर्धेत विद्यामाता इंग्लिश स्कुलमधील 17 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात आठ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, नऊ विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल, व सात विद्यार्थ्यांनी ब्रांझ मेडल पटकावले. शाळेने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळवून धानुरी व संपूर्ण परिसराचे नाव लौकिक केले. या सर्व विद्यार्थ्यांना महमदरफी शेख, लता पाटील व सुनील कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापुरे यांनी कौतुक केले.