Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा शहरात आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमास मोठा प्रतिसाद

by admin
in लोहारा तालुका
A A
0

शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात खेटे मारावे लागू नये यासाठी शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
लोहारा शहरात शुक्रवारी (दि.९) महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमात आमदार चौगुले बोलत होते.

\"शासन
लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ज्ञानराज चौगुले होते. या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार संतोष रुईकर, युवा नेते किरण गायकवाड, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, मोहन पनुरे, जगन्नाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, उपनगराध्यक्ष आयुब शेख, भास्कर बेशकराव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुरेश गायकवाड, नगरसेविका सारिका बंगले, शामल माळी, आरती कोरे, अविनाश माळी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंत जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रहीम शेख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, वनपरिमंडळ अधिकारी बी. पी. मुदाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. पचरांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

\"शासन
महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.९) हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये नवीन आधारकार्ड काढणे, दुरुस्ती करणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे / नाव वाढविणे, जीर्ण / खराब शिधापत्रिका बदलणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धापकाळ / विधवा / दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना , नवीन वीज कनेक्शन अर्ज स्वीकृती ( घरगुती), वीजबिल दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी करणे, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती यासह इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत वनपरीक्षेत्र सामाजिक वनीकरण – ८, तालुका आरोग्य अधिकारी – ३०, महीला व बालकल्याण विभाग – ४२, पंचायत समिती – ९१, लोहारा नगरपंचायत – ७९, गटशिक्षणधिकारी कार्यालय -५०, पशुसंवर्धन कार्यालय – ५५, तालुका कृषी अधिकारी कार्यालय – २९, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय – १७८, ग्रामिण रुग्णालय लोहारा – ३ तर तहसिल कार्यालया अंतर्गत विविध विभागातील योजना व प्रमाणपत्र असा १७६२ जणांनी लाभ घेतला. एकूण २३२७ लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

\"शासन \"\"
यावेळी पुढे बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, शासकीय योजनेचा लाभ मिळवून देतो असे म्हणून अनेक ठिकाणी काही दलाल कार्यरत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होते. त्यामुळे नागरिकांनी अशा दलालांपासून सावध राहावे. कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या कार्यालयात जाऊन त्या योजनेची माहिती घ्यावी. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एखाद्या योजनेची माहिती विचारण्यासाठी सर्वसामान्य नागरिक जेंव्हा शासकीय कार्यालयात येतो. त्यावेळी त्या अधिकाऱ्याने सर्वसामान्य जनतेला व्यवस्थित मार्गदर्शन करावे अशी सूचना आमदार चौगुले यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी गणेश पवार आदिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मंगल कार्यालयाबाहेर विविध शासकीय कार्यालयाचे स्टॉल उभारण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले. सूत्रसंचालन कमलाकर येणेगुरे, भीमाशंकर डोकडे यांनी केले.

Tags: शासन आपल्या दारी
Previous Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यास भेट देऊन आ. चौगुले यांनी केली पाहणी

Next Post

पक्ष वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

पक्ष वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!