Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

पक्ष वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन शनिवारी (दि.१०) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.

                   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त लोहारा येथील कार्यालयासमोर स्वातंत्र्य सैनिक प्रयागबाईकदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, सामाजिक न्याय विभागाचे जालिंदर कोकणे, शहराध्यक्ष आयुब शेख, प्रकाश भगत, नरदेव कदम, शब्बीर गवंडी, लक्ष्मण रसाळ, मिलिंद नागवंशी, स्वप्निल माटे, मुरलीधर पाटील, सचिन रणखांब, अश्फाक शेख, लक्ष्मण बिराजदार, वामन भोरे, व्यंकट राजपूत आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.

\"राष्ट्रवादी \"\" \"\"

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान त्यांच्या गावी जाऊन करण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, कृषी, सहकार, आरोग्य, जलसंधारण, औद्योगिक प्रकल्प आणि महिला सक्षमीकरण हा विकासाचा पॅटर्न राबवून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवणारी, तसेच पुरोगामी विचारांचा वसा अखंडपणे तेवत ठेवणारी ही २४ वर्षे आहेत अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

Tags: राष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

लोहारा शहरात आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमास मोठा प्रतिसाद

Next Post

चालत्या कारला लागली आग (burning car) ! लोहारा तालुक्यातील आष्टामोड जवळ घडली घटना – पहा व्हिडीओ

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

चालत्या कारला लागली आग (burning car) ! लोहारा तालुक्यातील आष्टामोड जवळ घडली घटना - पहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!