उमरगा चौरस्ता येथे नाकाबंदी दरम्यान हैदराबाद कडून आलेली इनोव्हा कार चेक करत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील इनोव्हा गाडीत गांजा सदृश्य अंमली पदार्थाची २७ पाकिटे मिळून आली आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या आदेशाने दिनांक 17.6. 2023 रोजीचे 00.00 ते दिनांक 18.6.2023 रोजीचे 05.00 वाजेपर्यंत उमरगा चौरस्ता येथे पो.नि. राठोड यांनी लावलेल्या अंमलदारास Asi/499 सूर्यवंशी, PN/1613 सय्यद, PC/1752 घाटे,PC/1735 भोरे, PC/1806 कांबळे असे नाकाबंदी करत असताना 04.30.वा.सु. एक इनोवा कार क्र.Ap 29 BR 1116 ही हैदराबाद कडून आली असता तीस नकाबंदी दरम्यान चेक करण्यासाठी थांबवली. त्यामध्ये वाहन चालक व त्याच्यासोबत एक इसम असे दोघेजण पळून जात होते. त्यांच्येवर संशय बळावल्याने लागलीच त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडून वरील सदरचे वाहन पो स्टेला आणून नमूद वाहन चेक करण्यात आले. त्यामध्ये अमली पदार्थ गांजाचे एकूण 27 पाकिटे मिळून आल्याने त्याचे एकूण 56.515 कीलो वजनचा त्याची एकूण किंमत 5,65, 159 रु. असा असून ईनोवा गाडीची किंमत 8,00,000 रू. असा एकूण मुद्देमाल किंमत अंदाजे 13,65,150 रू. मिळून आला आहे.
यातील आरोपी नामे 1) अल्ताफ नजीर शेख राहणार – कुष्ठधाम कॉलनी, विवेकानंद चौक ,सारोळा रोड, लातूर येथील असून त्यांना ताब्यात घेऊन वरील प्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्यावर सपोनि महेश् क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरीही मा. पोलीस अधिक्षक अतुल् कुलकर्णी सर , अप्पर् पोलिस् अधीक्षक नवनीत कावत सर ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राठोड,सपोनी महेश क्षीरसागर, Asi/499 सूर्यवंशी, पो ना सय्यद्, PC/1752 घाटे, PC/1735 भोरे, PC/1806 कांबळे,पो.का गहिनीनाथ बिराजदार, पो.का. सिद्धेश्वर बिराजदार यांनी केली आहे. पुढील तपास सपोनी कासार करत आहेत.