लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Chatrapati Shivaji Maharaj jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार गरगडे हे होते. यावेळी उपसरपंच वंदना गरगडे, सहशिक्षक महादेव कुंभार, एकलव्य वाचनालयाचे अध्यक्ष मोहन गोरे, जेष्ठ नागरिक विश्वनाथ मत्ते, बब्रुवान भोंडवे, आनंदा हिरवे, तुकाराम भोंडवे, उत्तम बोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कोकण विभाग सहाय्यक सहकार अधिकारी पदी मोघा बु येथील राणी सत्यवान सुर्यवंशी हिची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालक सत्यवान सुर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला.

विकास घोडके यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी राणी सुर्यवंशी हिने सत्काराला उत्तर देताना शिक्षणाचे महत्व, पालकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांचे कर्तव्य, मी कशी घडले यावर पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन यापुढील काळात मोघा खु येथील एक होतकरु मुलगी शिक्षणासाठी दत्तक घेईन असा मानस व्यक्त केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास घोडके, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अंगद भोंडवे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिवहरी दळवे, मारुती भोंडवे, गंगाराम भोंडवे, बालाजी बाबळे, दादा पवार, बालाजी सोनटक्के, संजय भोंडवे, योगेश गोरे, विनायक गरगडे, गोपाळ गोरे, विनायक दळवे, बबन भोंडवे, महादेव पाटील, हमीद मुजावर, सुरेखा भोंडवे, वैशाली गरगडे, शैला गोरे, मनिषा गोरे, रेखा दळवे, कालिंदा मत्ते, गिता सुर्यवंशी, गुंडूबाई मोहीते, रैसा मुजावर, यांच्यासह पालक, नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके यांनी आपल्या गावातून आधिकारी, कर्मचारी निर्माण व्हावेत यासाठी पालक, गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेवून शाळेच्या विकासाला हातभार लावून शाळेला मदत करावी असे आवाहन केले.






