Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची सांगता – राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धकांच्या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

मुख्य संपादक by मुख्य संपादक
13/03/2024
in वाढदिवस शुभेच्छा
A A
0
लोहारा महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची सांगता – राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धकांच्या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

लोहारा येथील महाशिवरात्री यात्रामहोत्सवानिमित्त सोमवारी ( दि. ११) आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
लोहारा (lohara) येथे महाशिवरात्री (mahashivratri) महोत्सवानिमित्त दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे हे २४ वे वर्ष आहे. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस विविध कार्यक्रम झाल्यानंतर सोमवारी (दि. ११) रात्री लोहारा हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेने या महोत्सवाची सांगता झाली. या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन आकांक्षा चौगुले, लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, नगरसेविका आरती गिरी, अभिमान खराडे, चंद्रकांत पाटील, प्रसाद जट्टे, पोलीस निरीक्षक अजितकुमार चिंतले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आकांक्षा चौगुले, अभिमान खराडे, बालाजी मक्तेदार यांनी मार्गदर्शन करून स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी डॉ. अमलेश्वर गारठे, अमीन सुंबेकर, अविनाश माळी, दिपक रोडगे, विजयकुमार ढगे, विष्णू नारायणकर, बालाजी मक्तेदार, शिवा स्वामी, चेतन बोंडगे, ओम कोरे, राजेंद्र फावडे, महेश घोटाळे, दगडू तिगाडे, विक्रांत संगशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत लावणी, देशभक्ती गीत, रिमिक्स, हिंदी मराठी आदींसह विविध कलाप्रकारावर दिलखेचक नृत्य सादर करुन स्पर्धकांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेत पुणे, लातूर, बीड, पंढरपूर, सातारा, उमरगा यासह अनेक ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. रात्री ९ च्या सुमारास सुरू झालेली ही स्पर्धा मंगळवारी पहाटे ५ पर्यंत चालली.

महेंद्र बनसोडे पुणे, कावेरी जाधव माकणी, प्रतिक्षा बंडगर लातूर, सानिका भागवत सातारा, मानवी पतंगे, सायली मुळे पुणे आदींनी बहारदार नृत्य सादर केले. तसेच छत्रपती शिवाजी हायस्कुल नांदेड (राजस्थानी नृत्य), ओसम डान्स ग्रुप लातूर (हरियाणा लोकनृत्य), कलाश्री ग्रुप बीड, लावणी – खेळताना रंग बाई होळीचा), डीडीएस ग्रुप पंढरपूर ( हिपॉप) या डान्स ग्रुपने सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. यावेळी अनेक स्पर्धकांच्या नृत्य

सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच सामूहिक गटाच्या सादरीकरणावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून शुभम खोत पाटील, निलेश हतांगळे, सुरेश वाघमोडे यांनी काम पाहीले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीने परीश्रम घेतले. या दरम्यान रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. विठ्ठल वचने पाटील यांनी प्रास्ताविक केले. भीमाशंकर डोकडे, सतीश ढगे यांनी सूत्रसंचालन केले. गोपाळ सुतार यांनी आभार मानले. राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील महिला, नागरिक, युवक व परीसरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


————

राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –

वैयक्तिक (लहान गट) –

सर्व बक्षिसे विभागून
प्रथम – मानवी पतंगे, अंबाजोगाई व आस्था डोगे अंबाजोगाई
द्वितीय – सायली मुळे, पुणे व जान्हवी कसबे, लातूर
तृतीय – शौर्य शर्मा परभणी व विराट काळे, लातूर

वैयक्तिक (मोठा गट)
सर्व बक्षिसे विभागून

प्रथम – अनामिका अहिरे, बीड व गणेश पवार लातूर
द्वितीय – महेंद्र बनसोडे, पुणे व हृषीकेश राठोड
तृतीय – सानिका भागवत, सातारा व घनश्याम सोनवणे मुंबई

सामूहिक (लहान गट)
सर्व बक्षिसे विभागून

प्रथम – ऑसम डान्स अकॅडमी लातूर व राजमुद्रा डान्स ग्रुप उमरगा
द्वितीय – आयुष डान्स परभणी व आर्यन डान्स अकॅडमी लातूर
तृतीय – छत्रपती शिवाजी स्कुल नांदेड व स्वामी समर्थ ग्रुप लोहारा

सामूहिक (मोठा गट)
सर्व बक्षिसे विभागून

प्रथम – सुरज ग्रुप लातूर व बिडीएस ग्रुप पंढरपूर
द्वितीय – कलाश्री बीड व रायझिंग स्टार पुणे
तृतीय – ध्रुव ग्रुप सातारा व जी बी डान्स लातूर

युगल जोडी गट ( जोडी)
सर्व विभागून

प्रथम – गणेश, दिनेश लातूर व श्वेता, सुप्रिया बीड
द्वितीय – शैलेश, शक्ती लातूर व आर्यन, आयुष पुणे

तृतीय – जान्हवी कसबे, त्रिजळ कसबे लातूर व ओम, तुषार पुणे

Tags: महाशिवरात्रीयात्रा महोत्सव लोहाराराज्यस्तरीय नृत्य स्पर्धा
Previous Post

लोहारा तालुक्यातील खेड येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शरवीन शेख तर उपाध्यक्षपदी अश्विनी कांबळे

Next Post

लोहारा‌ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती कार्यकारिणीची निवड – अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर सचिवपदी तानाजी माटे

Related Posts

जिल्ह्याच्या सहकारातील सहकारमहर्षी प्रा. सुरेशदाजी बिराजदार
आपला जिल्हा

जिल्ह्याच्या सहकारातील सहकारमहर्षी प्रा. सुरेशदाजी बिराजदार

20/08/2025
सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मनोहर वाघमोडे यांची निवड
वाढदिवस शुभेच्छा

सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मनोहर वाघमोडे यांची निवड

07/02/2024
लोहारा तालुका

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने शालेय विद्यार्थाना फळे व खाऊ वाटप

27/07/2023
उमरगा तालुका

ज्ञानज्योती बहुद्देशिय सामजिक संस्थेचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर – 2 जुलै रोजी उमरगा येथे होणार पुरस्कारांचे वितरण

22/06/2023
वाढदिवस शुभेच्छा

आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

30/10/2022
आपला जिल्हा

आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

30/10/2022
Next Post
लोहारा‌ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती कार्यकारिणीची निवड – अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर सचिवपदी तानाजी माटे

लोहारा‌ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिती कार्यकारिणीची निवड - अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर सचिवपदी तानाजी माटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's