लोहारा (lohara) तालुक्यातील मोघा (बु) येथे गुरुवारी (दि.१६) खरीप हंगाम बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन (soyabin) पिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीमध्ये सोयाबीन पिकाची लागवड, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, बीबीएफ द्वारे पेरणी, गोगलगाय नियंत्रण, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी डेमो शेतकऱ्यांना दाखवण्यात आला. तसेच महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या योजना विषयी माहिती देण्यात आली. कृषी पर्यवेक्षक आर.बी. बनजगोळे व कृषि सहाय्यक जे. एस. पवार यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी शरण्णाप्पा कोणाळे, ग्रामसेवक श्री. दबडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे गुरुवारी (दि. १६) खरीप हंगाम नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये सोयाबीन बियाणे उगवन क्षमता चाचणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच सोयाबीन पिकाची लागवड, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, बीबीएफ द्वारे पेरणी, गोगलगाय नियंत्रण, महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेततळे योजना, एमआरईजीएस (mregs) फळबाग लागवड विषयी माहिती देण्यात आली. उपस्थितांना कृषि सहाय्यक व्ही.व्ही. पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उमेदच्या संगीता कांबळे, आशा जाधव यांनीही माहिती दिली.