Vartadoot
Saturday, January 31, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुरेश दाजी बिराजदारांना देणार विधानपरिषदेवर संधी !

मुख्य संपादक by मुख्य संपादक
20/06/2024
in आपला जिल्हा, राजकीय
A A
0
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुरेश दाजी बिराजदारांना देणार विधानपरिषदेवर संधी !
Ad 10

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक प्रा सुरेश दाजी बिराजदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून विधान परिषदेवर संधी मिळण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून चर्चिली जात आहे. यासाठीच्या हालचालींना वेग आला असून जुलै महिन्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांमध्ये सुरेशदाजी बिराजदार यांची निवड होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधान परिषदेच्या तीन जागा , तर राज्यसभेच्या दोन जागा येत आहेत. त्यात विधान परिषदेच्या तीन जागांपैकी एका जागेवर धाराशिव येथील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुरेश दाजी बिराजदार यांना विधान परिषदेवर संधी देण्याची घोषणा केली होती. धाराशिव लोकसभेसाठी अजित पवार यांनी सुरेश बिराजदार यांना तयारी करण्याची सूचना देत सहा महिन्यापूर्वीच कामाला लावले होते. त्यानुसार सुरेशदाजी बिराजदार यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता व जोरात तयारीही केली होती. पण राजकीय घडामोडीत सदरील जागा आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना देण्यात आल्याने श्री. सुरेशदाजी बिराजदार यांना थांबण्यास सांगण्यात आले. अजितदादांच्या आदेशाप्रमाणे सुरेशदाजी बिराजदार यांनी पक्षाचे एकनिष्ठ पणे कामही केले. पण त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी अजितदादांनी धाराशिव येथील जाहीर सभेत पुढील काही दिवसांत सुरेश बिराजदार यांना विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता. मागील ४० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ट असलेल्या कै. आ. भाऊसाहेब बिराजदार यांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवणाऱ्या तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर आलेल्या संकटसमयी खंबीरपणे पक्षाशी साथ देत पक्षाला उभारी देणाऱ्या सुरेश दाजी बिराजदार यांना संधी मिळणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुका तसेच परिसरातील भागामध्ये सातत्याने कोरडा आणि ओल्या दुष्काळाचे संकट कायम घोंगावत असते . तीस वर्षांपूर्वी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाने येथील शेतकरी नागरिक प्रगतीपासून वंचित राहिलेला आहे . हा भाग राष्ट्रवादी विचारधारेला मानणारा असूनही विधानसभा आरक्षित असल्याने बिराजदार यांची अडचण झाली होती . श्री बिराजदार यांनी अडचणीत आलेली जिल्हा बँक वाचवण्यासाठी केलेला यशस्वी प्रयत्न, धाराशिव जिल्ह्यामध्ये बेरोजगार व्यवसायिक यांच्यासाठी उभारलेले भाऊसाहेब बिराजदार बँक तसेच समुद्राळ येथे उभारलेला भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना यामुळे चार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा व पक्ष अडचणीत असताना पक्षाची घेतलेली जबाबदारी समर्थपणे पार पडल्याने या सर्व बाबींचा सारासार विचार केला असता श्री सुरेश बिराजदार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत, सर्वसामान्य जनतेत उत्साहाचे वातावरण आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसविधानपरिषदसुरेशदाजी बिराजदार
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे कृषी संजीवनी पंधरवडा साजरा

Next Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Related Posts

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक
निवडणूक

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

24/11/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी
निवडणूक

भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी

06/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's