लोहारा तालुक्यातील सालेगाव येथून पोलिसांनी गावठी पिस्टल (बंदुक) व डबलबोरचे काडतुस जप्त केले आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि.२) रात्री उशिरा लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अजितकुमार चिंतले, परि. पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, पोलीस हवालदार/282 कांतू राठोड, पोलीस हवालदार/1128 विठ्ठल ढवण पोलीस अंमलदार/1593 विजय घोडके असे पेट्रोलिंग कामी लोहारा पोलीस ठाणे हद्दीत रावाना होवून माकणी येथे आले असता पथकास गुप्त बातबीदारामार्फत माहिती मिळाली की, सालेगाव येथली इसम नामे रणजीत कालीदास यादव, वय 27 वर्षे, सुरज रुपसेन देशपांडे, वय 19 वर्षे यांनी गावठी पिस्टल (बंदुक) व डबलबोर चे काडतुस आणले आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने यावर लोहारा पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जावून 19.15 वा नमुद इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 20, 500 ₹ किंमतीचे गावठी पिस्टल(बंदुक) व डबलबोर चे काडतुस मिळून आले. यावर पथकाने त्यास अटक करुन त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्टल व डबलबोर चे काडतुस जप्त करुन त्यांचेविरुध्द पोलीस ठाणे लोहारा येथे गुरनं 153/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, भारतीय न्याय सहिंता कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा श्री. शेलार यांचे मार्गदर्शनाखाली लोहारा पोलीस ठाण्याचे चे पोलीस निरीक्षक श्री चिंतले, परि. पोलीस उप निरीक्षक केंद्रे, पोलीस हवालदार/282 राठोड,पोलीस हवालदार/1128 ढवण पोलीस अंमलदार/1593 विजय घोडके यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे हे करत आहेत.
The forum describes 52 children undergoing surgery at a special camp in Sasthur. But if disability is framed as something to be “prevented” or “corrected” through charity, what message do we send disabled children about their worth—and what responsibilities do we avoid by celebrating these camps instead of building inclusive healthcare and society?
Also, for anyone who regularly needs accurate numbers, conversions or calculations, I’ve found this free tool really helpful: https://multiplecalculator.com/