उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने विविध विकास कामे पूर्ण केली असून यासोबतच राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मतदार संघातील ७० हजारावर महिलांना दिला असून केलेली विविध विकास कामे आणि लाडकी बहीण योजना या दोनच मुद्द्यावर मी निवडणूक लढवीत असून विकास कामे आणि लाडक्या बहिणींच्या आशीवार्दावरच येणारी निवडणूक जिंकणारच अस आत्मविश्वास आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केला.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी या भागातील महिलांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी सभापती दिलीप गौतम, प्रा. शौकत पटेल, विलास व्हटकर, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, भाजप नेते राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सरपंच महेश घोटाळे, उपसरपंच लक्ष्मण माने, चेअरमन बाबुराव बिराजदार, प्रतापसिंग राजपूत, भाजपाचे राम शंकर मिटकरी, राष्ट्रवादीचे दयानंद थोरात, लक्ष्मण बिराजदार, केशव राजपूत, भैरव गोपाल सिंग राजपूत, नितीन मिटकरी, बालाजी शिरोळकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, विकासाच्या माध्यमातून महायुती सरकारने शेतकरी, युवक, महिला हिताच्या योजना आणल्या. या योजनांमुळेच आज जनताही महायुती सरकारसोबत आहे. आपण विकासकामांमध्ये कधीही राजकारण केले नाही. येणाऱ्या काळात २१ टीएमसी पाणी कराळी डोंगरापर्यंत आणण्याचा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
यावेळी व्यंकटसिंग राजपूत, शिवराम दंडगुले, शिवराम चव्हाण, तुकाराम चव्हाण, सचिन गायकवाड, विकास चव्हाण, बालाजी पवार, लक्ष्मण राम माने, किशोर राजपूत, शांताप्पा मिटकरी, बालाजी यादव, अमोल थोरात, लक्ष्मी गायकवाड, सविता मनोहर, शेषाबाई गायकवाड, निलाबाई थोरात, सीताबाई गायकवाड, अलका थोरात, सुजाता मनोहर, रमाबाई मनोहर, राजाबाई थोरात आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.