Vartadoot
Tuesday, July 21, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हराळी येथील माजी सरपंच व त्यांच्या सख्या पुतण्याचा अपघाती मृत्यू

मुख्य संपादक by मुख्य संपादक
18/11/2024
in क्राईम न्यूज, लोहारा तालुका
A A
0
हराळी येथील माजी सरपंच व त्यांच्या सख्या पुतण्याचा अपघाती मृत्यू
Ad 10

लोहारा तालुक्यातील हराळी येथील माजी सरपंच व त्यांच्या सख्या पुतण्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१६) रात्री साडे अकराच्या सुमारास हराळी गावाजवळ घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील हराळी येथील माजी सरपंच युवराज शंकराव पाटील- सूर्यवंशी हे सदन शेतकरी असून त्यांचा जेसीबी व ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. शनिवारी (दि.१६) रात्री साडे अकराच्या सुमारास डिझेल आणण्यासाठी मोटर सायकलवर जेवळीकडे जात होते. हराळी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर भरधाव मोटर सायकलचा ताबा सुटून मोटरसायकल रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडल्याने मोटर सायकल स्वार माजी सरपंच युवराज शंकरराव पाटील- सूर्यवंशी (वय ६५) व त्यांचा सख्खा पुतण्या गणेश दगडू पाटील गंभीर जखमी झाले. परंतु रात्रीची वेळ असल्याने तसेच खड्ड्यात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे असल्याने हा अपघात कोणाच्या नजरेस आला नाही. यामुळे वेळेवर मदत न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. डिझेल घेऊन शेताकडे गेले असतील असा समज त्यांना झाला. पहाटे व्यायामासाठी गेलेल्या युवकांना ही घटना नजरेस पडली. त्यानंतर नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. सख्ख्या काका पुतण्याचा व माजी सरपंच असलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, बीट अंमलदार कान्तू राठोड घटनास्थळी दाखल होत केला. मृतांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

कामे आणि बहिणींच्या आशीर्वादावरच जिंकू – आ. चौगुले यांना विजयाचा आत्मविश्वास

Next Post

धम्मदिप कांबळे याचे कुस्ती स्पर्धेत यश

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post
धम्मदिप कांबळे याचे कुस्ती स्पर्धेत यश

धम्मदिप कांबळे याचे कुस्ती स्पर्धेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's