लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे कृषी विभाग व ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर, तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, मंडळ कृषी अधिकारी नयन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या संकल्पनेने व ग्रामस्थांच्या श्रमदानातून कृषी पर्यवेक्षक रवी बनजगोळे, कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी मंगळवारी (दि.१०) प्रदिप पाटील यांच्या शेतात वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. मागील काही काळापासून कृषी विभागाच्या वतीने वनराई बंधाऱ्याची संकल्पना राबविली जात आहे. या योजनेमध्ये पाणी आडवा पाणी जिरवा तसेच या वनराई बंधाऱ्यामुळे पाणी अडवले जाणार असून शेतकऱ्यांना सिंचन स्त्रोताचा फायदा होणार आहे. आष्टा कासार येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी येथे श्रमदानातून वनराई बंधारे उभारणी केली. यावेळी समाज भूषण माजी मुख्याध्यापक सिद्रामप्पा तडकले गुरुजी, प्रगतशील शेतकरी मल्लिनाथ चिंचनसुरे, कृषी सेवा केंद्र चालक मुकेश मुळे, प्रदीप पाटील, विजय टिकांबरे, तुळशीदास सगर, मोहन आकडे, सुरेश सोमवंशी, बाशा शेख, अफसर पटेल, प्रवीण हरके, गोपाळ इंगोले, गणेश आकडे, निखिल मदने, बालाजी सूर्यवंशी, कृषि सहाय्यक सचिन पवार, कृषि मित्र जिनेंद्र कासार, अमोल बलसुरे व शेतकरी उपस्थित होते.