हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंगजी आयलाने, सचिव विनोदजी जटाळ साहेब उपस्थित होते. सर्वप्रथम सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर शाळेतील श्रेयश वाघमारे, वरद वाघमारे, भूमी आयलाने, प्रांजल फुलमंटे, आस्था शेळके, माही आयलाने या विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालिका दिन साजरा कारण्यात आला. यावेळी शाळेतील अंकिता पांचाळ, स्वानंदी खरोसे, रुद्रायणी वाघमारे, आराध्या उडगे, परेदी उडगे, शरण्या एकलारे या विद्यार्थिनींनी सावित्रीमाईची वेशभूषा परिधान केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंगजी आयलाने साहेब आपल्या भाषणातून वरील विद्यार्थ्यांचे कौतुक करून सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर माहिती देत असे म्हणाले की, या वर्षीपासून सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य चव्हाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या समन्वयक राजश्री आयलाने मॅडम यांनी केले. यावेळी शाळेतील सहशिक्षक श्री खोत सर, भोसले सर, तेलंगे सर महिला शिक्षिका सौ.शुभांगी फुलमंटे, कीर्ती वाघमारे अपेक्षा उटगे मॅडम यांनी सहकार्य केले.