लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि.३) सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या गणवेशात आली होती. कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई बद्दल भाषण व कविता गायन केले. इयत्ता सहावी व सातवीच्या मुलींनी सावित्रीची ओवी म्हणून दाखवली. मोठ्या उत्साहात बालिका दिन शाळेमध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, शिक्षक अनंत कानेगावकर, मोरवे खिजर, सुनंदा निर्मले, मल्लिकार्जुन कलशेट्टी, बबीता शिंदे, छाया जाधव व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.