लोहारा येथील लोकवाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियान अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक वाचनाचा शुभारंभ सोमवारी (दि.६) करण्यात आला.
दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात ग्रंथपदर्शन, पुस्तक वाचन, वाचकांची संख्या वाढवण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रंथालयात दिवसभर ग्रंथ व विविध प्रकारचे नवीन ऐतिहासिक साहित्य, बाल साहित्य, ग्रंथ शालेय विद्यार्थ्यांना, वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. वाचकांच्या वाढीकरिता सामाजिक प्रबोधन करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अजित चिंतले, साहाय्यक गटविकास अधिकारी जे. टी. वग्गे, गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, लोकवाचनालयाचे सचिव माणिक तिगाडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक प्रशांत काळे, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरी लोखंडे, मंडळ अधिकारी जगदीश लांडगे, ग्रंथपाल संजय जेवळीकर, बालाजी बिराजदार, जसवंतसिंह बायस, गिरीश भगत, अशोक दुबे, मेहबूब फकीर, अब्बास शेख, यशवंत भुसारे, सुधीर कोरे, सदाशिव जाधव, गणेश खबुले सुमित झिंगाडे, आदम पठाण, सुनील ठेले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या अभियानात जवळपास साडेतीन हजार महत्त्वाची जुनी आणि नवीन ग्रंथ व पुस्तके वाचकांसाठी दिवसभर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अशी माहिती सचिव माणिकराव तिगाडे यांनी दिली.