लोहारा तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या प्रतिभा भीमराव गायकवाड (उगाडे) यांना नुकतीच बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे .
“यूज ऑफ वेबबेसड इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस बाय पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडन्ट ऑफ नॅक ॲक्रिडीटेड कॉलेजस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड : अ क्रिटीकल ॲनालिसीस” या विषयावर पीएचडी प्रदान झाली असून त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. वैजनाथ कांबळे यांनी मार्गदर्शन केले आहे. डॉ. शर्मिला चिकाटे व डॉ. प्रदीप घंटे यांनी त्यांना संशोधन करण्यासाठी सहकार्य केले आहे. या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे व सर्व पदाधिकारी भारत शिक्षण संस्था उमरगा, तसेच कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय माकणी येथील प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.