लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील रहिवाशी दयानंद गाडेकर यांची कन्या व आष्टा हायस्कूलची माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या गाडेकर हीची मुंबई पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदावर निवड झाली आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने व प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला .
तालुक्यातील आष्टाकासार येथील ऐश्वर्या गाडेकर हिने आष्टा हायस्कुल मधून १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर १२ वी सायन्स करून पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केला. शाळेत असताना तीने स्काऊट गाईड मध्ये विविध मेळाव्यात सहभाग नोंदवला होता. त्याच वेळी तिने वेगळे काहीं तरी करायचे असे मनात ठरवले होते. स्काऊट गाईडचा युनिफॉर्म पाहून तिला युनिफॉर्म बाबतचे आकर्षण वाटले. आणि त्यानुसार तिने पोलीस भरतीहोण्याचा मनात ठाम निश्चय केला. त्यानुसार अक्कलकोट येथील भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात भाग घेतला व तेथे १ वर्ष राहून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तेथील वातावरणाने ती बरेच दिवस आजारी पडली. घरातील सर्वांनी आता नको म्हंटले. पण उराशी बाळगलेली जिद्द ती लपवू शकली नाही. घरातील आई, वडील, भाऊ आत्त्या या सर्वांचे मन वळवून पुन्हा ती सोलापूर येथील प्रशिक्षण केंद्रात सहभागी झाली. दोन वेळा भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला यश मिळाले नाही. परंतु हार न मानता तिने परत मुंबई येथे झालेल्या ८ ऑगस्ट २९२४ रोजीच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाली. तेथे मैदानी चाचणी मध्ये निवड झाली आणि नंतर लेखी परीक्षा मुंबई येथे झाली. या परीक्षेचा निकाल लागला असून ऐश्वर्या गाडेकर हीची निवड मुंबई पोलीस दल येथे कॉन्स्टेबल पदावर झाली. ही बातमी कळताच गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच तिच्या परिवारातील सर्वांना खूप आनंद झाला. तसेच शाळेतील सर्वांनी आनंद व्यक्त केले. या निमित्ताने सोमवारी (दि.१०) आष्टा शिक्षण संस्था आष्टा कासार या संस्थेचे सचिव जयप्रकाश चौधरी यांच्या वतीने व आष्टा हायस्कूल आष्टा कासार येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ऐश्वर्या हिने विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कुठलेही यश प्राप्त करायचे असेल तर मनाशी जिद्द बाळगून संघर्ष करा अशी भावना तिने व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे सचिव जयप्रकाश चौधरी, मुख्याध्यापक जी.एस. काजळे, डी.जी. सावंत, यु.के. पवार, एस.एम. व्हट्टे, डी.एन. बलसूरे, एच.एस.जाधव, जी. एस. गित्ते, वी.वी. खरात, व्ही. व्ही. कांबळे, बी.बी. मूळे, वी. बि. बचाटे, ए.डी. काळे, पी.बी. साखरे, आर. एच. चव्हाण उपस्थित होते. एम. डी. सोमवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रंचालन करून आभार मानले.
