Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/02/2025
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
Ad 10

धाराशिव भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येरमाळा येथील विद्यानिकेतन विद्यालयामध्ये जिल्हा मेळावा संपन्न झाला. लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल मध्ये सोमवारी (दि.१०) या मेळाव्यातील यशस्वी विध्यार्थ्यांना उपनगराध्यक्ष अमीन सूंबेकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात लोहारा नगरपंचायत उपनगराध्यक्ष अमीन सूंबेकर, स्काऊट मास्टर नागेश ढगे, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी भव्य शेकोटी, शोभायात्रा, तंबू सजावट, बिन भांड्याचा स्वयंपाक, प्रशमंजुषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या मेळाव्यातील यशस्वी विध्यार्थ्यांना उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर व स्काऊट मास्टर नागेश ढगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी लोहारा नगर पंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी नुकतीच निवड झाल्या बद्दल अमीन सुंबेकर यांचा व प्रमूख अतिथी नागेश ढगे यांचा स्कुलतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमधील बनी – टमटोला व बुलबुल विभागातील लहान चिमुकल्यांनी जिल्हा मेळाव्यातील भव्य शेकोटिनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मोबाईलचा अतिवापरामुळे मानवी जीवनात होणारे दुष्परिणाम हा सामजिक संदेश दिला. फुले – सावित्री नसती तर आज मुलगी शिकली असती का या गीतावर अतिशय सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या मेळाव्यामध्ये यश प्राप्त केलेल्या विध्यार्थ्यांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका सविता जाधव, हेमा पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी तर सिद्धेश्वर सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी स्कूलमधील सर्व विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुललोहारा
Previous Post

पोलीस दलात निवड झाल्याबदल आष्टा हायस्कूल येथे ऐश्वर्या गाडेकर हीचा सत्कार

Next Post

भातागळी जिल्हा परिषद शाळेचे एनएमएमएस परिक्षेत यश

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
भातागळी जिल्हा परिषद शाळेचे एनएमएमएस परिक्षेत यश

भातागळी जिल्हा परिषद शाळेचे एनएमएमएस परिक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's