लोहारा तालुक्यातील खेड येथील गट नंबर ५५ मधील शेतकरी बाळासाहेब बाबुराव पाटील यांनी सदर गट नंबर मधील दोन एकर क्षेत्रामध्ये गोदावरी कंपनीची २०१३ – ४१ पांढरी या जातीच्या तुरीची दि १६ जून २०२४ रोजी स्वतः बैलावरील तिफनीने पेरणी केली. व नंतर पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया केली सदर तुरीसाठी आजपर्यंत दोन वेळेस फवारणी केली आहे , व एक वेळेस पाट पाणी दिले आहे. सदर तुरीच्या दोन रांगेतील अंतर साधारणता सहा ते सात फूट आहे. तुरीच्या शेंगा मधील बियांची संख्या चार आहे, त्यामुळे सरासरी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. सदर शेतकरी यांना प्रति एकर ९ ते १० क्विंटल तुरीचे उत्पन्न अपेक्षित आहे. सदर बियाणे लागवड करण्यासाठी कृषी सहाय्यक श्री. निळकंठ पाटील यांनी प्रोत्साहित केले. तसेच याबाबत वेळोवेळी फवारणी, ड्रिंचिंग याबाबत मार्गदर्शन केले. याबाबत श्री. निळकंठ पाटील साहेब व कृषी विभागाचे आभार संबंधीत शेतकरी यांनी व्यक्त केले. तसेच सदर तुरीचा प्लॉट प्रत्यक्षात शेतकरी यांनी पहावा व याच बियाणाचा वापर करून आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन ही केले आहे.