लोहारा (Lohara) कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पणन संचालक विकास रसाळ यांनी आदेश दिले आहेत. या प्रशासकीय मंडळात पाच जणांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासन पणन संचालनालयाचे पणन संचालक दि.७ जुलै रोजी याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. या पत्रात लिहिले आहे की, शासनाने कृषि उत्पन्न बाजार समिती लोहारा या बाजार समितीच्या संचालक मंडळाचा ५ वर्षाचा नियमित कार्यकाळ संपलेला असुन तेथे दि.०९.०२.२०२१ पासून कार्यरत असलेल्या प्रशासक यांच्याऐवजी खालील नमूद केलेल्या व्यक्तींची अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य म्हणुन नेमणुक करण्यास महाराष्ट्र कृषि उत्पनन पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम-१५(अ) अन्वये शासनाची मान्यता देण्यात येत आहे असे कळवुन याबाबतचे सविस्तर आदेश या कार्यालयाचे स्तरावरुन निर्गमित करण्यात यावेत असे कळविले आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धाराशिव यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती लोहारा, जि.धाराशिव येथे अशासकिय मंडळ नुियक्त करणेबाबत ५ सदस्य पात्र असलेबाबत अहवाल सादर केलेला आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धाराशिव यांचेकडील अहवालानुसार सदस्य पात्रता धारण करत असल्यामुळे व शासनाने अशासकिय प्रशासक मंडळ नियुक्त करणेबाबत मान्यता दिली असल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समिती, लोहारा, जि.धाराशिव या बाजार समितीवर अशासकिय प्रशासक मंडळ नियुक्त करणे आवश्यक असल्याची माझी पुर्णपणे खात्री झाल्यामुळे मी विकास रसाळ, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असे आदेश देतो की, कृषि उत्पन्न बाजार समिती लोहारा यांचे दैनंदिन कामकाज पार पाडण्याकरीता या बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात येत आहे. या अशासकीय मंडळात प्रशांत बब्रुवान काळे, नेताजी कमलाकर शिंदे, विश्वनाथ लक्ष्मण सूर्यवंशी, हरी मलाप्पा लोखंडे व दिपक कोंडाप्पा मुळे यांचा समावेश आहे. या बाजार समितीवर सहाय्यक निबंधक बालाजी काळे हे प्रशासक म्हणून कामकाज पाहत होते. या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती झाल्याचे आदेश आल्याने बुधवारी (दि. ९) बाजार समितीचा कार्यभार प्रशासक मंडळाकडे दिल्याचे बालाजी काळे यांनी सांगितले.

