लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे रुजू झाले आहेत.
लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, धाराशिव येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांची बदली करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी बदल्यांचे आदेश जारी केले असून बदलून आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन ठिकाणी हजर राहून जबाबदारी स्वीकारावी असे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी लोहारा पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारला आहे. शनिवारी रात्री लोहारा पोलीस ठाण्यात नूतन अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे यांचे स्वागत तर अजित चिंतले यांना निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.