Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील महाशिवरात्री (Mahashivratri) यात्रा महोत्सवास बुधवारी (दि.२६) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त शहरातील जगदंबा मंदिरातून महादेवाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते आरती करून मोठ्या उत्साहात वाजता गाजत फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीची व महादेवाच्या मानाच्या काठ्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. सलग पाच दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात सांस्कृतिक, क्रिडा, भारुड, कुस्ती यासह विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रा महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने झाली. यावेळी हरिहर भजनी मंडळाचे वारकरी टाळ, मृदुंग, हर हर महादेवच्या घोषणा देत पालखी व महादेवाच्या मानाच्या काठ्यांची जगदंबा मंदीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखी व महादेवाच्या काठ्यांचे व शोभायात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करून या शोभायात्रेचे मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली. यावर्षी या शोभायात्रेत आदिवासी नृत्य करणारे पथक आकर्षण ठरले. त्यानंतर ही शोभायात्रा जुन्या गावातील प्राचीन महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आली. दुपारी २ वाजता भारुडाचा जंगी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी लोहारा येथील चालक व मालक संघटनेच्या वतीने उपस्थित भाविकांना फराळ व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महादेव मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता दिपोत्सव (खास महिलांसाठी ) कार्यक्रम संपन्न झाला.

\"\"
यावेळी शहरातील युवक, यात्रा कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लहान मुले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेनिमित्त महादेव मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त बुधवारी पहाटेपासूनच महादेव मंदिरात भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गुरुवारी सकाळी दहा वाजता संजय महाराज वेळापुरे यांचे कीर्तन तर सायंकाळी चार वाजता जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे.
Ad 2
Ad 1
Tags: महाशिवरात्रीयात्रा महोत्सव लोहारालोहारा
Previous Post

सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी स्वीकारला लोहारा पोलीस ठाण्याचा पदभार

Next Post

विक्रीसाठी घेऊन जात असलेला प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी सुपारी लोहारा पोलिसांनी पकडला; २३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

विक्रीसाठी घेऊन जात असलेला प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी सुपारी लोहारा पोलिसांनी पकडला; २३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!