लोहारा शहरातील पैगंबर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आयुब शेख तर उपाध्यक्ष पदी इस्माईल मुल्ला यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरात पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या जुलूसच्या नियोजनासाठी नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष म्हणून माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुब हबीब शेख यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी इस्माईल मुल्ला यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीचे आयोजन महेबूब सुभहानी दर्गाह येथे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सय्यदशाह हुसेन कादरी (फज्जू साहेब) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत जयंती उत्सव कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या बैठकीत सचिवपदी उपनगराध्यक्ष आमीन सुंबेकर, कोषाध्यक्षपदी इम्रान भोंगळे, तर कार्याध्यक्ष पदी रहेमान मुल्ला आणि आयुब शेख यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी आमीन कुरेशी आणि आरिफ खानापुरे यांच्यासह इतर सदस्यांची निवड देखील यावेळी करण्यात आली.
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंमद पैगंबर यांनी मानवतेचा संदेश दिला. त्यांनी शांती, सहिष्णुता, प्रेम, आणि सच्चाई या मूल्यांची शिकवण दिली. सामाजिक समता, गरिबांवर दया आणि सत्याचा आग्रह हा त्यांच्या जीवनकार्याचा मुख्य आधार आहे. त्यांच्या या आठवणींना स्मरण करीत ईद-ए-मिलादुन्नबी साजरी केली जाते असे यावेळी सांगण्यात आले.

आयुब शेख

इस्माईल मुल्ला