लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवले आहे.
शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी जन्मेजय मुकुंद जगताप याने बॉक्सिंग या शालेय क्रीडा स्पर्धेत विभाग स्तरावर सुवर्णपदक पटकावले. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बॉक्सिंगसाठी निवड झाली आहे. तसेच श्रीधर क्षीरसागर याची कुस्ती (ग्रीको, वजनी गट ५५) या प्रकारात धाराशिव जिल्हातून निवड होऊन विभागासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सतीश इंगळे, प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, उपप्राचार्य प्रा. हनुमंत कलबुर्गे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना प्रा. मुंडे मॅडम, प्रा.विनोद तुंगे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.







