महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस परिक्षेत याही वर्षी जि.प.प्रशाला भातागळी शाळेने अखंड यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.
या शाळेतील श्रद्घा प्रविण जगताप हीने तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तसेच नंदिनी देडे, श्रेयश जगताप, साईराज जगताप, ऋतुजा देशमुख, शिवानी कुलकर्णी, शितल जगताप, सायली जगताप, अलिशा शेख, सोहम जगताप या विद्यार्थिनीही घवघवयीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व विद्यार्थ्याना शिक्षक बालाजी माने, मधुकर शिंदे आणि सुषमा जट्टे यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकिशोर गायकवाड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कोंडीबा कारभारी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी आनंदगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकिशोर गायकवाड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कोडिंबा कारभारी, विठ्ठल कवाळे, बालाजी नाईक, मेघराज कदम, सुर्यकांत वैरागकर, शंकर काळे, विशाल साळवे, सोनाली जगताप व विद्यार्थी उपस्थित होते.